नवी दिल्ली : उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आता भारताच्या बाजूनं कठोर पावलं उचलण्याची तयारी सुरू झाली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशातल्या सिंधू नदीच्या पाण्याविषयीच्या करारावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवाया यापुढे सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. त्याचच एक भाग म्हणून परराष्ट्र सचिव विकास स्वरूप यांनी सिंधू नदीच्या पाणीवाटपाचा करार एकट्या भारतावरच बंधनकारक नाही असं सूचक विधान गेल्या आठवड्यात केलं होतं. त्याला अनुसरून आज होणारी बैठक महत्वाची आहे. या बैठकीला पंतप्रधान कार्यालायचे सचिव, त्याचप्रमाणे पाणी पुरवठा मंत्री, परराष्ट्र खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे. सिंधू पाणी करारावर पाकिस्तानची कोंडी करण्याच्या पर्यायांवर या बैठकीत चर्चा होईल.