हमसफर एक्सप्रेसचे भाडे वाढणार

रेल्वे प्रशासनाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे रेल्वे प्रशासन हमसफर एक्सप्रेसचे भाडेवाढ करण्याच्या विचारात आहे. विशेष आरक्षित वर्गासाठी एसी कोच-3 मध्ये अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. पण सोबतच दरात देखील वाढ करण्यात येणार आहे.

Updated: Nov 27, 2016, 04:10 PM IST
 हमसफर एक्सप्रेसचे भाडे वाढणार title=

नवी दिल्ली : रेल्वे प्रशासनाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे रेल्वे प्रशासन हमसफर एक्सप्रेसचे भाडेवाढ करण्याच्या विचारात आहे. विशेष आरक्षित वर्गासाठी एसी कोच-3 मध्ये अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. पण सोबतच दरात देखील वाढ करण्यात येणार आहे.

हमसफर एक्सप्रेसच्या प्रत्येक कॅबिनमध्ये चहा, कॉफी आणि सूप वेडिंग मशीन, तसेच ठंड आणि गरम पदार्थासाठी मशीन, अशा अनेक सुविधांनी परिपूर्ण अशी रेल्वे सुविधा असणार आहे. हमसफर एक्सप्रेस ह्याच महिन्यात प्रवाशांच्या सेवेत येणार होती, पण नुकत्याच कानपूरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे आणि अन्य कारणांमुळे येण्यास उशीर झाला आहे.
 
पुढ्याच्या महिन्यातच्या सुरूवातीला नवी दिल्लीपासून ते गोरखपूर दरम्यान हमसफर एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आधुनिक सुविधांनी पूर्ण अशा या रेल्वे निर्मितीचा खर्च देखील जास्त आहे. त्यामुळे इतर नियमित गाड्याच्या तुलनेत या विशेष सुविधा असलेल्या रेल्वेचे भाडे अधिक असणार आहे.
 
नवीन ७ इंटरसिटी हमसफर एक्सप्रेस प्रवाशांसाठी दाखल होणार असून, सामान्य एसी-3 कोचमध्ये अतिरिक्त सुविधा देण्यात येणार आहेत. अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी 2016-17 च्या रेल्वे बजेटमध्ये केली होती.