आयकर विभागाने मिळवली ३,१८५ कोटींची अघोषित संपत्तीची माहिती

आयकर विभागाने ८ नोव्हेंबरपासून आतापर्यंत 3,185 कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीची माहिती मिळवली आहे. यासोबतच 428 कोटींची रोख रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत.

Updated: Dec 20, 2016, 09:48 PM IST
आयकर विभागाने मिळवली ३,१८५ कोटींची अघोषित संपत्तीची माहिती  title=

नवी दिल्ली : आयकर विभागाने ८ नोव्हेंबरपासून आतापर्यंत 3,185 कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीची माहिती मिळवली आहे. यासोबतच 428 कोटींची रोख रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत.

आयकर विभागाने ८६ कोटीच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. तर ३१०० लोकांना नोटीस पाठवल्या आहेत. आयकर विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार नोटबंदीनंतर ३९० कोटी रुपये जप्त केले गेले आहेत. तर दुसरीकडे २६१४ कोटीची अघोषित संपत्ती घोषित केली गेली आहे.

नोटबंदीनंतर १४ डिसेंबरपर्यंत आयकर विभागाकडून ५८६ कारवाया झाल्या. ३१६ कोटींच्या जुन्या नोटा तर ८६ कोटींच्या नव्या नोटा यामध्ये जप्त करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे एकूण ३९३ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.