नवी दिल्ली : नोटबंदीनंतर सरकारने अनेक कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्ष सरकारवर टीका करत असली तर सरकारकडून रोज वेगवेगळे निर्णय घेतले जात आहे. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर सरकार ठामपणे कारवाई करतांना दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी देखील काळा पैसा असणाऱ्या व्यक्तींना इशारा दिला आहे.
आयकर विभागाने आता अशा व्यक्तींची नावे आणि माहिती मागवली आहे ज्यांनी एका दिवसात ५० हजार रुपये जमा केले आहेत. ९ नोव्हेबर ते ३० डिसेंबरपर्यंत २.५ लाखापेक्षा अधिक रुपये जमा केल्यास त्यांची माहिती सुद्धा मागवण्यात आली आहे.
आयकर विभागाने पोस्ट ऑफिस आणि बँकांना सांगितलं आहे की, ५० हजारहून अधिक रुपये जमा करणाऱ्या व्यक्तींची माहिती द्यावी. कोणताही व्यक्ती रोज बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये या ५० दिवसांमध्ये 2.5 लाखापेक्षा अधिक पैसे जमा करतो आणि त्याबाबत त्याच्याकडे योग्य पुरावा नसेल तर अशा व्यक्तींवर कारवाई होणार आहे.
पोस्ट ऑफिस आणि बँकांना याबाबत ३१ जानेवारी २०१७ पर्यंत माहिती आयकर विभागाला द्यायची आहे.