`इंडियन मुजाहिद्दीन`चा म्होरक्या यासिन भटकळ अटकेत!

कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ याला नेपाळमध्ये अटक करण्यात आलीय. एनआयएच्या टीमनं नेपाळमधून त्याला अटक केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 29, 2013, 11:56 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ याला नेपाळमध्ये अटक करण्यात आलीय. एनआयएच्या टीमनं नेपाळमधून त्याला अटक केलीय.
इंटरपोलच्या मदतीनं नेपाळ पोलीस आणि कर्नाटक पोलिसांनी नेपाळमधून यासीनला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भटकळ हा दहशतवादी संघटना ‘इंडियन मुजाहिद्दीन’चा संस्थापक आहे. अनेक दहशतवादी कारवायात भटकळचा हात असल्याचं उघड झालं होतं.
यासिन भटकळ हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. काही दिवसांपूर्वी बिहारच्या बोधगयामध्ये महाबोधी मंदिर परिसरात नऊ बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये दहशतवादी भटकळचाच हात असल्याचं पुढे आलं होतं.
राष्ट्रीय चौकशी समिती (एनआयए)नं यासंबंधी ज्या १२ दहशतवाद्यांचे फोटो जाहीर केलेत त्यांपैकीच इंडियन मुजाहिद्दीनच्या संस्थापकांपैकी एक असलेला यासिन भटकळही आहे.

पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, हैद्राबाद बॉम्बस्फोट, वाराणसी बॉम्बस्फोट,मुंबईतील दोन बॉम्बस्फोट या दहशतवादी हल्ल्यांमध्ये यासीनचा सहभाग स्पष्ट झाला होता. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रियाज भटकळ आणि इक्बाल भटकळ या भटकल बंधूंचा यासीन हा धाकटा भाऊ आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.