बँक, पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असल्यास...

काळा पैसाधारकांच्या मुसक्या आवळण्यासाठी शनिवारी केंद्र सरकारने नवा नियम लागू केलाय. यामुळे बँक तसेच पोस्टामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असणाऱ्या बेकायदा व्यवहारांना चाप बसणार आहे. 

Updated: Jan 8, 2017, 03:30 PM IST
बँक, पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असल्यास... title=

नवी दिल्ली : काळा पैसाधारकांच्या मुसक्या आवळण्यासाठी शनिवारी केंद्र सरकारने नवा नियम लागू केलाय. यामुळे बँक तसेच पोस्टामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असणाऱ्या बेकायदा व्यवहारांना चाप बसणार आहे. 

नव्या नियमानुसार सरकारने सर्व बचत खाते धारकांना पॅन नंबरची माहिती देणे अनिवार्य केले आहे. यासाठी सरकारने 55 दिवसांचा कालावधी दिलाय. या कालावधीत बचत खातेधारकांना पॅननंबरची माहिती देणे गरजेचे आहे. 

खरतर 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरममयान ज्यांच्या खात्यात अडीच लाखाहून अधिक रक्कम जमा झालीये त्याची माहिती बँक तसेच पोस्टाला आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. 15 जानेवारीपर्यंत ही माहिती देण्याचे आदेश देण्यात आलेत.