नोटबंदी - एटीएम-बँकेची लाइन तोडल्यावर होऊ शकते जेल

 नोटबंदीनंतर देशात सर्वत्र एटीएम आणि बँकांच्या बाहेर रांगाच रांगा आहेत. अनेक जण शिस्तीने रांगांमध्ये उभे राहून पैसे काढण्याची वाट पाहत आहेत. पण काही जण लाइन सिस्टीम तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. पण अशा लोकांना इशारा देणारी बातमी आहे, अशा लोकांना जेलची हवा खावी लागू शकते. 

Updated: Dec 7, 2016, 10:51 PM IST
नोटबंदी - एटीएम-बँकेची लाइन तोडल्यावर होऊ शकते जेल  title=

मुजफ्फरनगर :  नोटबंदीनंतर देशात सर्वत्र एटीएम आणि बँकांच्या बाहेर रांगाच रांगा आहेत. अनेक जण शिस्तीने रांगांमध्ये उभे राहून पैसे काढण्याची वाट पाहत आहेत. पण काही जण लाइन सिस्टीम तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. पण अशा लोकांना इशारा देणारी बातमी आहे, अशा लोकांना जेलची हवा खावी लागू शकते. 

तुम्ही रांग तोडून एटीएममध्ये घुसण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हांला जेल होण्याची शक्यता आहे. मुजफ्फरनगर जिल्ह्यात असा एक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने एसबीआयच्या एटीएमची रांग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे वाद निर्माण झाला. यावेळी मोठी गर्दी झाली, लोकांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी वसीम नावाच्या व्यक्तीला अटक केली.