...म्हणून अखिलेश यादव यांचे नाक असे आहे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे नाक जवळून पाहिल्यास ते वाकडे दिसते. त्यांचे नाक असे का आहे याचे कारण फक्त काही लोकांनाच माहीत आहे. 

Updated: Jul 6, 2016, 09:10 AM IST
...म्हणून अखिलेश यादव यांचे नाक असे आहे title=

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे नाक जवळून पाहिल्यास ते वाकडे दिसते. त्यांचे नाक असे का आहे याचे कारण फक्त काही लोकांनाच माहीत आहे. 

एका मुलाखतीदरम्यान अखिलेश यांनी खुद्द याबाबतचे कारण सांगितले. अखिलेश यादव यांना फुटबॉल खेळाची आवड आहे. व्यस्त वेळापत्रकातून जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते फुटबॉलचा आनंद घेतात. फुटबॉलवरील या प्रेमानेच त्यांच्या नाकाला दुखापत झाली होती. 

त्यामुळे त्यांच्या नाकाचे हाड वाकडे झाले. मात्र त्यानंतरही त्यांचे फुटबॉलवरील प्रेम कायम आहे. अजूनही त्यांना जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा ते फुटबॉल खेळतात.