मुंबई : तुम्ही नवीन घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा... कारण, लवकरच घरांच्या चढ्या किंमती उतरण्याची चिन्हं दिसतायत, असं रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी म्हटलंय.
मुंद्रा यांच्या म्हणण्यानुसार, सध्या तयार असलेल्या घरांची संख्या इतकी वाढलीय की येणाऱ्या काही दिवसांत घरांच्या किंमती उतरतील. राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेट काऊन्सिलनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
‘देशातील 60 टक्क्यांहून नागरिकांना दररोज 2 डॉलरपेक्षाही कमी पैशांत आपला उदरनिर्वाह करणं भाग पडतंय. अशावेळी घरांच्या किंमती कमी होणं खूप महत्त्वाचं आहे’ असंही मुंद्रा यांनी म्हटलंय.
नुकत्याच आलेल्या एका सरकारी अहवालानुसार, शहरी भागांत लोकसंख्येच्या मानानं एक करोड 88 लाख घरं कमी आहेत. यामध्ये, आर्थिक रुपात मागासलेल्या एक करोड पाच लाख लोक आणि 74 लाख मध्यमवर्गीयांकडे स्वत:च घरं नाही.
मुंद्रा यांच्या म्हणण्यानुसार, आरबीआयकडे उपलब्ध असणाऱ्या आकड्यांनुसार अजूनही घरं आणि रिअल इस्टेटसाठी सामान्यांना बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होतंय... आणखीन काही ठोस पावलं उचलून इतर उपायांच्या साहाय्यानं घरांच्या किंमती रोखल्या जाऊ शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.