भारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रश्नच नाही - केंद्र सरकार

भारतरत्न पुरस्कार यंदा कुणाला मिळणार, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलीय. मात्र सरकार पातळीवर त्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचं केंद्र सरकारच्यावतीने आज स्पष्ट करण्यात आलं.

Updated: Aug 12, 2014, 04:40 PM IST
भारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रश्नच नाही - केंद्र सरकार title=

नवी दिल्ली : भारतरत्न पुरस्कार यंदा कुणाला मिळणार, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलीय. मात्र सरकार पातळीवर त्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचं केंद्र सरकारच्यावतीने आज स्पष्ट करण्यात आलं.

हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आदींचा 'भारतरत्न' पुरस्कारासाठी विचार सुरू असल्याचं सांगितलं जात होतं.

मात्र सध्या तरी भारतरत्नबाबत कोणत्याही नावाचा प्रस्ताव विचाराधीन नाही, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलंय. तर केवळ मीडियामध्येच भारतरत्नची चर्चा सुरू आहे. सरकार पातळीवर असा कोणताही विचार सुरू नसल्याचं संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना भाररत्न देण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचालींना वेग आलाय. केंद्रीय गृहमंत्रालयानं ध्यानचंद यांच्या नावाची शिफारस केलीय. पंतप्रधान कार्यालयाकडे त्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिलीय. भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणारे ध्यानचंद हे देशातले दुसरे खेळाडू ठरणार आहेत. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.