www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दारिद्र्यरेषा ही आधुनिक आणि स्वातंत्र्योत्तर राजकारणात वापरली जाणारी संज्ञा नाही. या शब्दाचा संदर्भ थेट औरंगजेबच्या काळात सापडतो.
औरंगजेबाचा जन्म 4 नोव्हेंबर 1618 साली झाला आणि 3 मार्च 1707 रोजी तो मरण पावला. औरंगजेबाचं आयुष्य 88 वर्षांचं होतं. 31 जुलै 1658 ते 3 मार्च 1707 अशी 58 वर्षांची औरंगजेबाची राजकीय कारकीर्द मानली जाते. दिल्लीपासून मराठवाड्यापर्यंत औरंगाबाजाचं साम्राज्य होतं. त्याचबरोबर आंध्र आणि कर्नाटकचा अर्धा भागही त्याच्या अधिपत्याखाली होता. इ.स. 1679 मध्ये औरंगजेबानं हिंदूंसाठी दारिद्र्यरेषेची आखणी केली होती. त्यानुसार ज्यांच्याकडं 10 हजार डिरॅमपेक्षा अधिक संपत्ती असेल, ते श्रीमंत गणले जात. 200 ते 10 हजार डिरॅमदरम्यान संपत्ती असणारे मध्यमवर्गीय गणले जात आणि 200 डिरॅमपेक्षा कमी संपत्ती असणा-यांना गरीब समजलं जायचं.
तत्कालीन हिंदूंमध्ये फूट पाडून मुस्लिम कायद्याचा प्रसार करण्याची औरंगजेबाची योजना होती. त्यावेळी मुघल साम्राज्यात जमा होणा-या उत्पन्नापैकी 6 टक्के उत्पन्न गरीबांकडून यायचं. 6.25 टक्के उत्पन्न मध्यमवर्गीयांकडून तर श्रीमंतांकडून केवळ 2.5 टक्के उत्पन्न राज्याच्या तिजोरीत जमा व्हायचं. गरीबांची थट्टा करून त्यांनाच लुबाडणारा जिझीया कर अशा पद्धतीनं वसूल व्हायचा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.