बाटला हाऊस एन्काऊंटर : शहजाद अहमदला जन्मठेप!

२००८ मध्ये झालेल्या बाटला हाऊस प्रकरणात एकमेव दोषी असणारा इंडियन मुजाहिदीन मधला शहजाद अहमद याला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि इस्पेक्टर मोहन चंद शर्मा यांना न्याय मिळाला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 30, 2013, 06:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
२००८ मध्ये झालेल्या बाटला हाऊस प्रकरणात एकमेव दोषी असणारा इंडियन मुजाहिदीन मधला शहजाद अहमद याला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि इस्पेक्टर मोहन चंद शर्मा यांना न्याय मिळाला.
दिल्लीमधील साकेत कोर्टात आज शहजाद अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्याचबरोबर त्यांच्यावर ९५००० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यापैकी ५०००० रूपये हे इस्पेक्टर मोहन चंद शर्मा यांच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे. न्यायाधीश राजेंद्र कुमार शास्त्री यांचासमोर अहमदला फाशी देण्याची मागणी केली होती. हे बॉम्बस्फोट दिल्ली गेटच्या परिसरात झाले होते. हे आंतकवादी बाटला हाऊसमध्ये लपले असल्याची खबर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांच्यामध्ये गोळीबार झाला, त्याच्याकडून होणाऱ्या गोळीबारात इस्पेक्टर शर्मा हे जखमी झाले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण त्यांनी तोपर्य़ंत आपला प्राण सोडला होता. आतिफ अमीन आणि मोहम्मद साजिद हे मारले गेले. मोहम्मद सैफ आणि जीशान यांना ताब्यात घेतले.
त्यानंतर २८ एप्रिल २०१० मध्ये अहमदवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायमूर्ती शास्त्रींनी २५ जुलैला इस्पेक्टर शर्मा यांची हत्या करण्याच्या आरोपाखाली अहमदला दोषी ठरवले. अहमदचे वकिल सतीश टम्टा याने अहमदला सुधण्याची एक संधी मिळावी असा आग्रह धरला. मात्र अखेर शहजाद अहमद याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.