शाही इमाम बुखारीच्या मुलाशी लग्नासाठी हिंदू मुलीने स्वीकारला इस्लाम?

दिल्लीच्या जामा मशीदीचे 2014मध्ये औपचारीक नायाब इमाम बनलेल्या शबान बुखारी आता हिंदू मुलीशी लग्न करीत आहेत. मीडियामध्ये आलेल्या बातम्यानुसार जामा मशीदचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा मुलगा शबान बुखारी गाजियाबादच्या हिंदू मुलीशी निकाह करणार आहे. या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून संबंध होते. ही बातमी अनेक हिंदी आणि इंग्रजी साइट्सवर प्रकाशित करण्यात आली आहे. 

Updated: Oct 5, 2015, 04:58 PM IST
शाही इमाम बुखारीच्या मुलाशी लग्नासाठी हिंदू मुलीने स्वीकारला इस्लाम? title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या जामा मशीदीचे 2014मध्ये औपचारीक नायाब इमाम बनलेल्या शबान बुखारी आता हिंदू मुलीशी लग्न करीत आहेत. मीडियामध्ये आलेल्या बातम्यानुसार जामा मशीदचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा मुलगा शबान बुखारी गाजियाबादच्या हिंदू मुलीशी निकाह करणार आहे. या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून संबंध होते. ही बातमी अनेक हिंदी आणि इंग्रजी साइट्सवर प्रकाशित करण्यात आली आहे. 

शबान बुखारी अमेठी विद्यापीठात सोशल वर्कचा विद्यार्थी आहे. आपल्या वडिलांनंतर शबान देशाच्या सर्वात मोठ्या मशीदीचे शाही इमाम होणार आहे. मीडियात आलेल्या बातम्यानुसार हिंदू मुली लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. सांगण्यात येते की यापूर्वी शईद अहमद बुखारी या लग्नाच्या विरोधात होते. पण मुलगी इस्लाम स्वीकारत असल्याचे म्हणून त्यांनी या लग्नाला मान्यता दिली आहे. शबान बुखारी आणि गाजियाबाद येथे राहणाऱी हिंदू तरूणी 13 नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. 15 नोव्हेंबर महिपालपूर येथील फॉर्म हाऊसमध्ये रिसेप्शन होणार आहे. 

दरम्यान, मुलीचे नाव अजून समजू शकले नाही. ही तरूणी इस्लाम स्वीकारण्यासाठी कुराणाचे अध्ययन करीत आहे. इमाम सैयद अहमद बुखारी यांनी आपल्या मुलाचे हिंदू तरुणीशी लग्न होत असल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.