पणजी : बॉलिवूडसह अनेक चित्रपटात काम केलेली हायप्रोफाईल अभिनेत्री झटपट पैसा मिळवण्याच्या आमिषाने वेश्या व्यवसायात गुंतल्याचं उघड झालंय. एका आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पणजी पोलिसांनी केलाय. पणजीतील एका तारांकित हॉटेलात बोगस ग्राहकाद्वारे सापळा रचून पोलिसांनी तेलगू अभिनेत्रीसह दलाल आयेशा सय्यद हिला अटक केली.
पोलिसांनी बोगस ग्राहक तयार करून मुंबईस्थित वेश्या व्यवसाय रॅकेटच्या दलालांशी संपर्क साधला. तीन लाख रुपयांचा सौदा झाला होता. त्यातील ५० हजार रुपये आगाऊ देण्यात आले होते. तारांकित हॉटेलमध्ये खोल्या आरक्षित करण्याची अटही घालण्यात आली होती.
या दलालांनी आरक्षण केलेल्या खोल्यांची खातरजमा केल्यावर, तसेच आगाऊ रक्कम पोचल्यावर तेलगू अभिनेत्री आणि तिच्यासोबत दलाल म्हणून एका तरुणीला पाठविले होते.संबंधित अभिनेत्रीने ५०हून अधिक हिंदी, कन्नड तसेच तमीळ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. हिंदीमधील "दबंग-2', "ओ माय गॉड' या चित्रपटांचा त्या समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.