सावधान! दिल्लीत 9 दहशतवादी शिरले, हाय अलर्ट जारी - रिपोर्ट

देशाच्या राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आलंय. पाकिस्तानातून 9 संशयित दहशतवादी दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती गुप्तचर विभागानं दिलीय. त्यामुळं सगळीकडे सावधगिरी बाळगली जातेय.

Updated: Aug 5, 2015, 11:49 PM IST
सावधान! दिल्लीत 9 दहशतवादी शिरले, हाय अलर्ट जारी - रिपोर्ट title=

नवी दिल्ली: देशाच्या राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आलंय. पाकिस्तानातून 9 संशयित दहशतवादी दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती गुप्तचर विभागानं दिलीय. त्यामुळं सगळीकडे सावधगिरी बाळगली जातेय.

या रिपोर्टनुसार दहशतवाद्यांजवळ मोठ्या प्रमाणात स्फोटकं असून त्यात आरडीएक्स आणि डेटोनेटर्सचा समावेश आहे. सरकारनं सर्व सुरक्षा विभागांना सावधानतेचा इशारा दिलाय. देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर घातपात होण्याची शक्यता आहे.

गुरूदासपूरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांसह, सीआयएसएफसह सर्व सुरक्षा विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हे 9 दहशतवादी तीन महिन्यांपूर्वी दिल्लीत आले आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.