मथुरा : मथुरेत एका महिलेनं एका अजब बाळाला जन्म दिला. या चिमुकल्याला दोन मान आणि दोन डोके आहेत. पण, जन्मानंतर थोड्याच वेळात या बाळाचा मृत्यू झालाय.
दिल्ली - आगरा राजमार्गावर कोसिकला भागात एका खाजगी रुग्णालयात सोमवारी रात्री उशीरा या बाळाचा जन्म झाला होता.
नर्सिंग होमचे संचालक डॉ. निरंजन लाल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाळाचे बाकीचे अवयव इतर मुलांप्रमाणेच नॉर्मल होते. पण त्याला दोन मान आणि त्यावर दोन डोके होते. या बाळाच्या एका चेहऱ्याचा रंग गोरा होता तर दुसरा चेहरा मात्र आश्चर्यकारकरित्या काळा होता.
रात्री जन्मलेलं हे बाळ सकाळपर्यंत स्थिर होतं... मात्र त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि हे बाळ दगावलं. या बाळाच्या आईची प्रकृती मात्र स्थिर आहे. हे तिचं पाचवं अपत्य होतं. तिचे याअगोदरचे सर्व म्हणजेच चारही मुलं सामान्य होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.