मेरठ : दोघा शिक्षक प्रेमी युगुलाला प्रेम व्यक्त करण्यासाठी शाळेला सुटी द्यावी लागली. मात्र, मुल अचानक घरी आल्याने पालकांनी मुलांना दमात घेत पळून आलात का, असे विचारले. त्यावेळी मास्तरांनीच सुटी दिल्याचे सांगितले. त्यावेळी खातरजमा करण्यासाठी काही पालक शाळेत गेल्याने भलताच प्रकार पुढे आला.
ही घटना बिजनौर येथे घडली. मुख्याध्यापकाने प्रेमलीलांसाठी शाळेला सुटी दिली. मात्र, त्याचे प्रेमप्रकरण पकडले गेल्यानंतर सुटी देणे महागात पडले. या प्रेमी शिक्षक युगुलाला निलंबित करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रेमचाळे केल्याने त्यांना अटकही करण्यात आली.
बागडपूर भागातील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाचे दुसऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिकेवर प्रेमहोते. प्रेयसीसोबत एकांतात राहता यावे म्हणून तसलीम हमिदी नामक या मुख्याध्यापकाने तीन तास आधीच शाळा सोडली. मुले घरी आल्याने पालकांना शंका आली. त्यांनी शाळेत धाव घेतली त्यावेळी मास्तर आणि महिला शिक्षक भलत्याच अवस्थेत सापडल्याने पालकांना धक्का बसला.
(एजन्सी)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.