'एका कुटुंबामुळे स्वातंत्र्य नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत निवेदन केलं.

Updated: Feb 7, 2017, 06:44 PM IST
'एका कुटुंबामुळे स्वातंत्र्य नाही' title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत निवेदन केलं. या निवेदनाच्या सुरूवातीलाच मोदींनी राहुल गांधींना जोरदार टोला लगावला. राहुल गांधींनी केलेल्या भाकितानुसार अखेर भूकंप आलाच असं सांगत त्यांनी खिल्ली उडवली. तर मल्लिकार्जुन खरगेंनी कुत्र्यांचा संदर्भ घेऊन भाजपवर केलेल्या टीकेलाही मोदींनी जोरदार उत्तर दिलं.

भारताला फक्त एका कुटुंबामुळे स्वातंत्र्य मिळालं नाही. या लढ्यात चाफेकर बंधू, सावरकर, भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांचंही योगदान होतं. काँग्रेसच्या स्थापनेआधीच 1857चा उठाव झाला, असं मोदी म्हणाले.

देशात काँग्रेसमुळे लोकशाही वाचली आहे, यामुळे तुम्ही पंतप्रधान झाल्याचं मल्लिकार्जुन खर्गे मोदींना उद्देशून म्हणाले होते. याचाही मोदींनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसनं लोकशाही वाचवण्याची मोठी कृपा केली आहे. 1975मध्ये काँग्रेसनं भारताला तुरूंग बनवलं होतं आणि वर्तमानपत्रांना कुलुपं लावली होती, असा टोला मोदींनी लगावला.