नवी दिल्ली : दिल्ली महिला आयोग अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी दिल्लीतील महिला सुधार गृह 'आशा किरण'बद्दल एक धक्कादायक दावा केलाय.
'बीबीसी'शी बोलताना स्वाती मालिवाल यांनी आपण दिल्लीतील रोहिणी भागातील दिल्ली सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या आणि मानसिक रुपात विक्षिप्त महिलांच्या सुधारगृह 'आशा किरण'चा गुपचूपपणे रात्री उशीरा दौरा केल्याचं म्हटलंय.
- या सुधार केंद्रात गेल्या दोन महिन्यांत 11 मृत्यू झाल्याचंही मालिवाल यांनी म्हटलंय.
- हे सुधारगृहात महिला जिवंतपणीच नरकयातना भोगत आहेत. स्वत:ची काळजी घेण्यास असमर्थ असणाऱ्यांसाठीच्या या सुधारगृहात एका बेडवर चार-चार महिलांना टाकलं जातं.
- बाथरुमपर्यंत ज्यांना जाता येत नाहीत त्यांचं मलमूत्र विसर्जन बेडवर किंवा फर्शीवर होतं... त्यामुळे संपूर्ण वार्ड केवळ घाणेरड्या वासानं भरलेला असतो.
- आंघोळीसाठी घेऊन जाण्यासाठी महिलांना नग्न अवस्थेत कॉरिडॉरमध्ये उभं केलं जातं.
- हे सगळं सीसीटीव्ही कॅमऱ्यांमध्येही दिसतं... आम्हीही हे व्हिडिओ पाहिले... धक्कादायक म्हणजे हे सीसीटीव्ही बनवण्याचं आणि मॉनिटर करण्याचां काम चार पुरुषांकडे सोपवण्यात आलंय.
- स्टाफच्या नावावर केवळ एक महिला आहे... तिलावर जवळपास 150 महिलांची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
चौकशीची मागणी...
दिल्ली महिला आयोगानं या प्रकरणात दिल्ली सरकारच्या सामाजिक कल्याण सचिवाकंडून 72 तासांत उत्तर देण्यास सांगितलंय. गरज पडल्यास पोलिसांचीही मदत घेतली जाईल, असंही आयोगानं म्हटलंय.