मुलींच्या शाळेत तरूण शिक्षकांच्या नियुक्तीला बंदी

राज्यातील मुलींच्या शाळांमध्ये यापुढे फक्त पन्नाशी पार केलेल्या शिक्षकांचीच नियुक्ती करण्यात येईल असा निर्णय हरियाणा  सरकारने घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री रामबिलास शर्मा यांनी ही घोषणा केली. नवे शिक्षण हस्तांतरण धोरण 2016 अंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे.

Updated: Jul 13, 2016, 06:18 PM IST
मुलींच्या शाळेत तरूण शिक्षकांच्या नियुक्तीला बंदी  title=

हरियाणा : राज्यातील मुलींच्या शाळांमध्ये यापुढे फक्त पन्नाशी पार केलेल्या शिक्षकांचीच नियुक्ती करण्यात येईल असा निर्णय हरियाणा  सरकारने घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री रामबिलास शर्मा यांनी ही घोषणा केली. नवे शिक्षण हस्तांतरण धोरण 2016 अंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे.

शिक्षण हस्तांतरण धोरण 2016 साठी प्राध्यापकांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. यात ज्या प्राध्यापकांचे वय 30 जूनच्या आधी 50 वर्षांपेक्षा कमी असेल त्यांनी मुलींच्या शाळेसाठी अर्ज करू नये असे सांगण्यात आले आहे. असे अर्ज आल्यास ते विचारात घेतले जाणार नाहीत असेही नमूद करण्यात आले आहे.

हरियाणा सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थीनींना तरूण प्राध्यापकांच्या नव्या विचारांना मुकावं लागणार आहे.