...आता इथूनही 'इंदिरा' - 'राजीव' बाहेर!

केंद्र सरकारनं आणखी एक उल्लेखनीय निर्णय जाहीर केलाय. राष्ट्रभाषा पुरस्कारांमधून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावाचा उल्लेख हटवण्यात आलाय. 

Updated: Apr 21, 2015, 02:05 PM IST
...आता इथूनही 'इंदिरा' - 'राजीव' बाहेर! title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं आणखी एक उल्लेखनीय निर्णय जाहीर केलाय. राष्ट्रभाषा पुरस्कारांमधून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावाचा उल्लेख हटवण्यात आलाय. 

हिंदी दिवसाच्या निमित्तानं दिल्या जाणाऱ्या यंदाच्या पुरस्कारांमधून इंदिरा आणि राजीव गांधी यांची नाव हटवण्यात आलीत. सरकारनं या पुरस्कारांचं पुन्हा एकदा नामकरण केलंय. हिंदी भाषेचा उपयोग प्रगतीशील पद्धतीनं करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. 

मिळालेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयानं गेल्या २५ मार्च रोजी याबाबत एक आदेश दिला होता. यामध्ये राष्ट्रभाषा पुरस्कारांमधून इंदिरा आणि राजीव गांधी यांची नाव हटवण्याचे आदेश दिण्यात आले होते. 

राजीव गांधी राष्ट्रीय ज्ञान पुरस्काराचं आता नवीन नाव आहे 'राष्ट्रभाषा गौरव पुरस्कार' तर इंदिरा राजभाषा पुरस्काराचं नवीन नाव आहे 'राष्ट्रभाषा कीर्ती पुरस्कार'... यापुढे हे पुरस्कार चारऐवजी दोन कॅटेगिरीमध्ये दिले जातील. दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.

यावर, मोदी सरकार बदल्याच्या भावनेनं काम करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.