...तर जरांगे यांचे आंदोलन शरद पवारांनी उभं केल्याचा ठपका बसेल; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ निष्कर्ष

Maharashtra Political News : टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतचा हा दावा आहे.   

वनिता कांबळे | Updated: Sep 28, 2024, 10:40 PM IST
...तर जरांगे यांचे आंदोलन शरद पवारांनी उभं केल्याचा ठपका बसेल; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ निष्कर्ष title=

Prakash Ambedkar On Manoj Jarange And Sharad Pawar : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मागील काही महिन्यांपासून सरकारला घाम फोडला आहे.  जरांगे-पाटलांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यावर कुणाचा तरी वरदहस्त आहे, त्यांचा गोडफादर कोण, जरांगेंचा बोलवता धनी कोण अशा चर्चा सुरु आहेत. जरांगेंच्या पाठिशी राष्ट्रवादी ते भाजप असे अनेक पक्ष असल्याच्या थिअरी मांडल्या गेल्यात आहेत. मात्र, अद्याप जाहीरपणे कुणाचेच नाव समोर आलेले नाही. अशातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत शरद पवार यांचे नाव घेत प्रकाश आंबेडकर यांनी मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली पाहिजे.. जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर हे आंदोलन शरद पवारांनीच चालवलं आहे असा निष्कर्ष लोक काढतील असा मोठा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं विधान केलंय. आंदोलन पवारांनी उभं केल्याचा ठपका बसेल असेही आंबेडकर म्हणाले. 

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात वार-पलटवार झाले.  जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसाकंडून लाठीमार झाला. तेव्हा मनोज जरांगे निघून गेले होते. मात्र शरद पवार पक्षाचे आमदार राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी मनोज जरांगेंना आंदोलस्थळी आणून बसवलं होतं, असा दावा, मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला होता. 

मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा - शरद पवार

मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याची माहिती शरद पवारांनी दिलीय. आम्ही आरक्षणाच्या बाजून असल्यांचंही शरद पवार म्हणाले होते. मराठा समाज आरक्षण मागतंय त्यात काहीही चूक नसल्याचंही शरद पवार म्हणाल होते. 
'शरद पवार यांनी जरांगे यांच्या मागणीला समर्थन आहे का हे स्पष्ट करावं' अशी मागणी ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांनी केले होते.  ओबीसी आंदोलकांनी अंतरवाली सराटीच्या वेशीवर  उपोषण केले होते. मात्र सरकारचा एकही प्रतिनिधी आलेला नसल्याची खंत मंगेश ससाणे यांनी व्यक्त केली. यावेळीच त्यांनी शरद पवारांवर हा आरोप केला होता.