नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही, हे स्पष्ट करत, काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांना नरेंद्र मोदी यांनी फटकारले.
कोणाच्याही वक्तव्याचे समर्थन करणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं. अभिभाषणाला उत्तर देताना राज्यसभेत त्यांनी सर्वच मुद्द्यांना स्पर्श केला. भूसंपादन विधेयकात योग्य ते बदल करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिलेत. या भाषणावेळी त्यांनी युपीएवरही हल्लाबोल केला.
यूपीएनं वाजपेयी सरकारच्या योजनांची कॉपी केली. योजनांची केवळ नावं बदलली, असा टोला त्यांनी लगावला. तसचं काँग्रेसच्या कार्यकाळात अनेक नियमबाह्य बदल्या झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. स्वच्छता अभिय़ान हे श्रीमंतांसाठी नसून ते गरीबांसाठी आहे, हे सांगायलाही मोदी विसरले नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.