नवी दिल्ली : 'मोदी सरकार'ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मंत्रिमंडळानं आज एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या वर्षभरातल्या कामांची यादीच वाचून दाखवलीय. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी, मोदी सरकार देशात महत्त्वाचे बदल घडवून आणण्यात प्रयत्नशील असल्याचं म्हटलंय.
गेल्या वर्षभरातल्या कामाचं मंत्रिमंडळाकडून सिंहावलोकन
पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यामुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला
गेल्या वर्षी देशात निरुत्साही वातावरण होतं - जेटली
जेटलींनी वाचली सरकारनं आणलेल्या नव्या कायद्यांची यादी
काळा पैसा कायदा संमत करण्यात आला
कोळसा आणि स्पेक्ट्रम वाटपातील मतभेद थांबवले
हायवे, रेल्वेमध्ये कामं खोळंबणार नाही इतका निधी दिलाय
पारदर्शक कारभारावर सरकारनं जोर दिला
गेल्या वर्षभरात देशाच्या विकासदरात वाढ झाली
सरकार तत्काळ निर्णय घेतंय
देशाच्या अर्थव्यवस्थेतही उत्साहाचं वातावरण
जीएसटीवर सरकारनं चांगले निर्णय घेतले
करप्रणालीत सुधार केले
आर्थिक मंदी असताना रेल्वे, रस्त्यांसाठी निधी दिला
लोकांच्या खिशात आता जास्त पैसा राहतोय
पैसा खर्च करण्याची क्षमता वाढवण्यावर भर
एनडीए सरकार आणि पक्षांमध्ये मतभेद नाही
महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू
वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.