आता ठराविक रकमेपेक्षा अधिकच्या खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक - जेटली

देशांतर्गत बाजारात काळ्या पैशांच्या व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी लवकरच एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी फेसबुक पोस्टवरून याबाबतचे संकेत दिले.

Updated: Oct 5, 2015, 04:35 PM IST
आता ठराविक रकमेपेक्षा अधिकच्या खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक - जेटली  title=

नवी दिल्ली: देशांतर्गत बाजारात काळ्या पैशांच्या व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी लवकरच एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी फेसबुक पोस्टवरून याबाबतचे संकेत दिले.

यावर्षी संसदेत सादर केलेल्या बजेटमध्ये एका लाखाहून अधिकच्या खरेदी-विक्रीसाठी पॅन बंधनकारक करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी ठेवला होता. जेटली म्हणाले, आयकर विभागाच्या देखरेखीखाली प्रणाली मजबूत करण्यात आलीय. करचोरी आणि करदात्यांबाबतची अन्य माहिती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाची मदत होत आहे. जीएसटी लागू होणं, या दिशेनं हे मोठं पाऊल आहे.

आणखी वाचा - आजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड मिळणार नाही

काळ्या पैशांचा एक मोठा भाग भारतातही आहे. अशा स्थितीत देशाच्या राष्ट्रीय भूमिकेत बदल करण्याची गरज आहे. जेणेकरून 'प्लॅस्टिक करन्सी' नियम बनेल. रोख व्यवहार अपवादात्मक स्वरूपात होतील. हा बदल लागू करण्यासाठी विविध प्राधिकरणांसोबत काम सुरू आहे, असं जेटली म्हणाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.