नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता घरात किती कॅश ठेवायची यासाठीही केंद्र सरकारकडून मर्यादा घालण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
सूत्रांच्या माहितीनुसार अर्थ मंत्रालयात याबाबतचा विचार सुरु आहे. असंही म्हटलं जातयं की मर्यादा 3 ते 15 लाखांपर्यंत असू शकते.
नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात जुन्या तसेच नव्या नोटांचे साठे देशातील विविध ठिकाणांहून जप्त करण्यात आलेत. त्या पार्श्वभूमीवर सरकार हा निर्णय घेण्याच्या विचारात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, भारतातील अर्थव्यवस्था पाहता कॅश बाळगण्याबाबतची मर्यादा कमी ठेवणे कठीण असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.