नवी दिल्ली : रेल्वेतील डब्यांमध्ये प्रवासी क्षमता वाढवणे, स्थानकांवर डिजीटल सोयी सुविधा, तसेच कमी उंचीच्या प्लॅटफॉर्मवरुन लोकांना सोयीस्कररित्या चढण्या-उतरण्याबाबतच्या अनेक प्रश्नांवर रेल्वेने नागरिकांना कल्पना सुचवण्यास सांगितले आहे.
रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने नवे अभियान सुरु केलेय. या अंतर्गत देशातील नागरिकांकडून रेल्वे प्रवास अधिक सुखकर, डिजीटलाईज कसा करता येईल याबाबतच्या कल्पना मागवल्यात. तसेच या अभियानात नागरिकांनी उत्साहाने सहभाग घ्यावा यासाठी रेल्वेकडून 12 लाख रुपयांची सहा बक्षिसेही ठेवण्यात आलीत.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी अर्थसंकल्पात या अभियानाबाबतची घोषणा केली होती. innovate.mygov.in या वेबसाईटवर या अभियानाबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.