नवी दिल्ली : केंद्र सरकारचे कर्माचारी ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसींवर नाराज आहे. पण जानेवारी महिन्यात श्रम मंत्रालय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची घोषणा करणार असल्याने त्यांना थोडा दिलासा मिळू शकतो.
सरकार प्रत्येक ६ महिन्यानंतर महागाई भत्त्याचं परिक्षण करते. सप्टेंबरमध्ये सरकारने महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर बेसिक पगार ११९ टक्के करण्याचा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. जो जुलै २०१५ पासून लागू झाला होता.
जानेवारीमध्ये जर महागाई भत्त्याची घोषणा केली असती तर महागाई भत्ता १२५ टक्क्यापेक्षा अधिक राहिला असता. ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार पगार भत्ता त्यामध्येच समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे जानेवारी २०१६ मध्ये तरी सरकार महागाई भत्त्याची घोषणा करणार नाही असंच दिसतंय.