नवी दिल्ली : ‘पेप्सिको’नं आपल्या कोल्ड ड्रिंक पेप्सीमध्ये असलेलं साखरेचं प्रमाण कमी करावं, अशा सूचना मोदी सरकारनं दिल्यात.
नुकतीच, अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी पेप्सिकोच्या चेअरमन आणि सीर्ईओ इंद्र नुई यांची भेट घेतली. यावेळी, त्यांनी ‘पेप्सी’मधलं साखरेचं प्रमाण कमी कराव्यात अशा सूचना दिल्यात. याचबद्दल, इंद्रा नुई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.
मंत्रालयातर्फे हरसिमर कौर यांची ही सूचना जाहीर करण्यात आलीय. दरम्यान, ‘पेप्सिको’कडून मात्र याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, कंपनीकडून उत्पादनांमध्ये केल्या जाणाऱ्या सोडियम आणि साखरेचं प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
काही विकसीत देशांत पेप्सी ‘स्टेविया’ नावाचा एक पदार्थ वापरला जातोय... हा पदार्थ कॅलरी स्वीटनर आहे. हा पदार्थ प्राकृतिकरित्या प्राग आणि ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या काही विशिष्ट झाडांमध्ये आढळतो. परंतु, हा पदार्थ अद्याप भारतात वापरला जात नाही. सरकारकडून अद्याप हा पदार्थ वापरण्यासाठी परवानगी नाही.
विशेष म्हणजे, पेप्सिकोनं भारतात 2020 पर्यंत 33,000 करोड गुंतवणूक करणार असल्याचं म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.