गुड न्यूज: तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल, ओळखपत्र गरजेचं नाही

तात्काळ तिकीट बुकिंगबाबत रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून आलेल्या आदेशानुसार काऊंटरवर तात्काळ तिकीट बुकिंग दरम्यान आता ओळखपत्राची फोटो कॉपी देण्याची गरज नसेल. तसंच ई-तिकीट बुकिंग करतांनाही ओळखपत्राचा नंबर टाकण्याची गरज असणार नाही.

Updated: Jul 16, 2015, 04:33 PM IST
गुड न्यूज: तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल, ओळखपत्र गरजेचं नाही title=

नवी दिल्ली: तात्काळ तिकीट बुकिंगबाबत रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून आलेल्या आदेशानुसार काऊंटरवर तात्काळ तिकीट बुकिंग दरम्यान आता ओळखपत्राची फोटो कॉपी देण्याची गरज नसेल. तसंच ई-तिकीट बुकिंग करतांनाही ओळखपत्राचा नंबर टाकण्याची गरज असणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी ओळखपत्रासंबंधी नियमांत बदल करत 1 सप्टेंबर 2015 पासून हे अधिक सोपी बनविण्याचा निर्णय केलाय. तात्काळ तिकीट बुकिंगदरम्यान आता प्रवाशांना ओळखपत्राची झेरॉक्स कॉपी सोबत देण्याची कटकट आता राहणार नाही. 

या अंतर्गत तात्काळ तिकीट बुकिंगसाठी ओळखपत्राच्या रुपात टीटीईला दहा पैकी कोणतंही एक ओळखपत्र दाखवलं जावू शकतं. बुकिंगच्यावेळी त्याची गरज नसेल. आतापर्यंत तात्काळचं तिकीट बुक करायचं असेल तर ओळखपत्राची कॉपी आणि ऑनलाइन बुकिंग करतांनाही ओळखपत्राचा नंबर देणं गरजेचं होतं. 

1 सप्टेंबर किंवा त्याआधीपासून ही सुविधा सुरू होणार आहे. यासाठी क्रिसनं सॉफ्टवेअरमध्ये बदल करायला सुरूवात केलीय. 

ओळखपत्राचा नंबर आणि फोटो कॉपी दिल्यानं त्याचा गैरवापर होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळं हा निर्णय घेतल्याचं कळतंय. 

आता हे 10 ओळखपत्र दाखवले तरी चालतील - 

  • वोटिंग आयडी, 
  • पॅन कार्ड, 
  • मान्यता प्राप्त शाळा-कॉलेजचं ओळखपत्र, 
  • पासपोर्ट, 
  • ड्रायव्हिंग लायसन्स, 
  • फोटो असलेलं क्रेडिट कार्ड, 
  • राज्य आणि केंद्र सरकारचा फोटो आयडी कार्ड, 
  • आधार कार्ड, 
  • केंद्रीय आणि राज्य पीएसयू, 
  • जिल्हा प्रशासन, 
  • स्थानिक संस्था आणि पंचायतद्वारे दिलं जाणारं ओळखपत्र

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.