www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आशिया कपमध्ये भारतीय वन डे संघातून डच्चू देण्यात आलेल्या सुरेश रैना याला बांगलादेशमध्ये होणाऱ्या आगामी तीन सामन्याच्या मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि उपकर्णधार विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत रैनाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
या दौऱ्यासाठी रोहित शर्मा, शिखर धवन, आर. आश्विन, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शामी यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. झहीर खानला डच्चू देण्यात आलाय.
आयपीएलमधील जबरदस्त कामगिरीमुळे वन डे संघात रॉबिन उथप्पाला संघात घेण्यात आले आहे.
दुसरीकडे इंग्लड दौऱ्यासाठी सलामीवीर गौतम गंभीर यांची निवड करण्यात आली आहे. मोठ्या गॅपनंतर गंभीरचे भारतीय संघात कमबॅक झाले आहे.
बांगलादेश एकदिवसीय संघ - सुरेश रैना (कर्णधार), रॉबिन उथप्पा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, अंबाती रायुडू, मनोज तिवारी, केदार जाधव, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), परवेझ रसूल, अक्षऱ पटेल, आर विनय कुमार, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी , मोहित शर्मा, अमित मिश्रा
इंग्लड दौऱ्यातील संघ: महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुरली विजयला, शिखर धवन, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, ईश्वर पांडे, ईशांत शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, वरुण आरोन, वृद्धिमान साहा, पंकज सिंग
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.