www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नफेखोरीमुळे ही घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक बाजारातील घडामोडी याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
जागतिक बाजारपेठेत मंदीचे सावट पसरल्याने सोने विक्री करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र आहे. स्टॉकिस्टकडून मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्यामुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 210 रुपयांनी घसरून 30,040 रुपये प्रतितोळा झाला. तर दुसरीकडे औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून चांगली मागणी न आल्याने चांदीचा भावही 800 रुपयांनी कमी होऊन 42,600 रुपये प्रतिकिलो असा होता.
जागतिक बाजार धोरणावर नकारात्मक परिणाम असल्याने सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव 0.50 टक्क्यांनी कमी होऊन 1288.10 डॉलर आणि चांदी 1.68 टक्क्यांच्या घसरणीसह 19.32 डॉलर प्रतिऔंस आहे. दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 210 रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे 30,040 आणि 29.840 रुपये प्रतितोळा झाला.
आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 100 रुपयांनी स्वस्त होऊन 24,900रुपयांवर खाली चांदीच्या शिक्क्यांचा भाव 3000 रुपयांनी कोसळून प्रतिशेकडा 79,000 ते 80,000 रुपयांवर बंद झाला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.