www.24taas.com, वृत्तसंस्था, अहमदाबाद
भारतीय लोकशाही जगातील एक चर्चेचा विषय असतो. एवढ्या मोठा देशात चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शकपणे मतदान पार पडते. भारताच्या लोकशाहीची नेहमीच चर्चा होत असते. आता तर एका व्यक्तीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र असणार आहे. याची चुणूक दिसून येणार आहे. त्यामुळे एकासाठी एक मतदान केंद्राची चर्चा सुरु आहे.
गुजरातमधील गिर अभयारण्यात केवळ एका मतदारासाठी उभारण्यात येणार आहे. हे स्वतंत्र मतदान केंद्र आयोगाच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा एक उत्तम नमुना आहे. आशियायी सिंहांचा रहिवास असलेल्या गिरच्या अभयारण्यातील बनेज पाड्यावर राहणारे महंत भारतदास दर्शनदास यांच्यासाठी हे स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे.
जुनागढ लोकसभा मतदार संघात हा भाग येतो. ३0 एप्रिलला येथे मतदान होत आहे. बनेज तिर्थधाम येथील मंदिरात दर्शनदास पुजारी आहेत. याआधीच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वाडीवरच स्वतंत्र मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळीही दर्शनदास यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक यंत्रणा सर्व व्यवस्था करणार आहे.
२९ एप्रिलला निवडणूक कर्मचारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासह बनेज येथे जातील. त्यांच्यासोबत वनविभागाचे कर्मचारीही असतील, असे जुनागढचे जिल्हाधिकारी आलोक कुमार पांडे यांनी सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.