सोनं आलं एवढं खाली...

जागतिक बाजारात सोन्याची आभूषण निर्मात्यांकडून तसेच किरकोळ मागणी घटल्याने, सोन्याचे भाव आणखी खाली येण्यास सुरूवात झाली आहे.

Updated: Aug 3, 2015, 07:57 PM IST
सोनं आलं एवढं खाली... title=

नवी दिल्ली : जागतिक बाजारात सोन्याची आभूषण निर्मात्यांकडून तसेच किरकोळ मागणी घटल्याने, सोन्याचे भाव आणखी खाली येण्यास सुरूवात झाली आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारात सोने ७० रूपयांनी खाली आले आहे, २५ हजार २३० रूपयांना प्रति दहा ग्रँम सोन्याचा भाव झाला आहे.

नाणी निर्मात्यांकडून मागणी कमी झाल्याने चांदीचा भावही किलोमागे १०० रूपयांनी कमी झाला आहे. चांदीचा भाव किलोला ३४ हजार २०० रूपये झाला आहे.

बाजारातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँक सप्टेंबर महिन्यात व्याज दर ठरवणार आहे, यामुळे सोन्याची मागणी घटल्याचं सांगण्यात येतंय. डॉलरच्या तुलनेत रूपया मजबूत झाल्याने मोठा प्रभाव पडला असल्याचं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.