नवी दिल्ली : परदेशातून मंदीच्या बातम्या आल्यानंतर, सोन्याची मागणी कमी होतेय, म्हणून दिल्लीच्या सराफ बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली आहे. आज सोनं चौथ्या दिवशी २७ हजारांच्या खाली घसरलं. सोनं आठवड्यातील सर्वात खाली, प्रति १० ग्रँम घसरून २६ हजार ९७० रूपयांवर आलं आहे.
औद्योगिक संस्थानं आणि नाणं निर्मातांच्या लिलावातील चलती वाढल्याने चांदी ५० रूपयांनी वाढलं आहे, चांदीचा भाव ३८ हजार ८०० रूपये प्रति किलोवर आला आहे.
दिल्लीत शुद्ध सोन्याच्या भावात १०० रूपयांची घसरण झाली आहे. ऐन लग्नसराई सोन्याचे भाव घसरले आहेत, मात्र परदेशात मंदी असल्याने, देशांतर्गत सोन्याची मागणी घटली असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.