सोने दरात मोठी घसरण

सोन्याने काल २०० रूपयांनी उसळी मारली होती. मात्र, आज सोने दर एकदम खाली आला. सोने २४,९७० रूपये प्रति तोळा झाले आहे. गेल्या दोन आठवड्यातील निच्चांकी घसरण आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 9, 2013, 10:46 AM IST

www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
सोन्याने काल २०० रूपयांनी उसळी मारली होती. मात्र, आज सोने दर एकदम खाली आला. सोने २४,९७० रूपये प्रति तोळा झाले आहे. गेल्या दोन आठवड्यातील निच्चांकी घसरण आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील उलाढालीचा परिणाम सोने बाजारावर झालाय. याच आठवड्यात सोने २५ हजारांच्या घरात येण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तविण्यात आली होती. आज सोन्याचा दर ४०५ रूपयांनी घाली आला. दुपारी १ वाजता सोने प्रति तोळा २५४१५ रूपये होता. मात्र, दुपारी सोने दरात घट होऊन ते २४,९७० रूपयांवर आलेय.

तर चांदीच्या दरात १९६ रूपयांनी वाढ होऊन प्रति किलो ३८, ९९२ रूपये झाले आहे. चांदीचा मध्यंतरी किलोचा दर ४८ हजारांच्या घरात गेला होता. सोने आणि चांदीच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम दिसून येत आहे. डॉलरचे मूल्य मजबुत होत असल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे. सोन्याचा दर आणखी खाली येण्याची शक्यता बाजार अभ्यास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सोने दर २४,६०० पर्यंत खाली येईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केलेय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.