राहुल-सोनियांना पाठवलेले ट्रक पडले बंद

उत्तराखंडमध्ये बचाव आणि मदतकार्य सुरू असताना रंगलेल्या राजकीय धुळवडीमध्ये कुरघोडी करण्याची घाई काँग्रेसला नडलीये..

Updated: Jun 27, 2013, 11:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, हृषिकेश
उत्तराखंडमध्ये बचाव आणि मदतकार्य सुरू असताना रंगलेल्या राजकीय धुळवडीमध्ये कुरघोडी करण्याची घाई काँग्रेसला नडलीये..
.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी नवी दिल्लीतून हिरवे झेंडे दाखवून उत्तराखंडला रवाना केलेले ट्रक योग्य नियोजनाअभावी हृषिकेशला अडकून पडलेत.
या ट्रक्समधलं इंधन संपलंय, ते भरण्यासाठी ड्रायव्हर्सकडे पैसे नाहीत अशी अवस्था आहे. ही स्थिती अशीच राहिली, तर आपल्याला ट्रकमधलं सामान विकावं लागेल, असा इशाराच या ड्रायव्हर्सनी दिलाय. दुसरीकडे काँग्रेसच्या मदत केंद्रातून मात्र याचा इन्कार करण्यात आलाय.
रस्ते खराब असल्यामुळे हे ट्रक हरिद्वार-हृषिकेश मार्गावर उभे असल्याचा दावा या केंद्रातून करण्यात आलाय. मात्र काँग्रेसच्या या दाव्यातला फोलपणा स्पष्ट दिसतोय, काँग्रेसच्या बेजबाबदारपणाचं हे उत्तम उदाहरण आहे अशी टीका भाजपने केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.