सण-वाराच्या दिवसांत सोन्याच्या किंमती वधारल्या

परदेशी बाजारात सोन्याचे भाव सध्या मंदावलेत. पण, भारतात मात्र सण-वारांचे दिवस आल्यानं सोन्याची किंमत 70 रुपयांनी वधारलेत. 

Updated: Aug 29, 2014, 11:52 PM IST
सण-वाराच्या दिवसांत सोन्याच्या किंमती वधारल्या title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : परदेशी बाजारात सोन्याचे भाव सध्या मंदावलेत. पण, भारतात मात्र सण-वारांचे दिवस आल्यानं सोन्याची किंमत 70 रुपयांनी वधारलेत. 

एका आठवड्यातील उच्च स्तर गाठून सोनं सध्या 28,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचलंय. तर चांदी 150 रुपयांनी वधारून 43,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचलीय. 

सिंगापूरहून मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक स्तरावर सोनं 1.15 डॉलरनं घसरून 1288.59 डॉलर प्रति औंसवर पोहचलंय. 
 
बाजार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रशिया आणि युक्रेनमधल्या वाढत्या तणावामुळे एकीकडे सोन्याला उभारी मिळतेय तर दुसरीकडे कमी मागणीमुळे दबावही कायम आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हमध्येही अमेरिकन अर्थव्यवस्थेत सुधारणा स्वीकारण्याच्या मागणीचा जोर वाढलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.