नवी दिल्ली : भारतात सोन्याची मागणी दिवसेंदिवस घटत चाललेली दिसून येतेय. वर्ष २०१४ दरम्यान अगोदरच्या वर्षाहून जवळपास १४ टक्क्यांनी घट होऊन ही मागणी ८४२.६ टन राहिली.
आंतरराष्ट्रीय सुवर्ण परषदेच्या म्हणण्यानुसार, मुख्यत्वे, आयातीवर प्रतिबंध घातल्यानं सोन्याच्या मागणीवर हा परिणाम दिसून आलाय. 'डब्ल्यूजीसी'च्या 'सोन्याची मागणी २०१४'च्या अहवालात २०१३ साली एकूण मागणी ९७४.८ टन होती, असं म्हटलं गेलंय.
मूल्याच्या संदर्भात पाहिलं तर सोन्याच्या मागणीत २०१४ मध्ये १९ टक्क्यांनी घट होऊन २,०८,९७९.२ करोड रुपये राहिली तर तीच २०१३ मध्ये २,५७,२११.४ करोड रुपये होती. भारतात एकूण दागिण्यांची मागणी २०१४ मध्ये आठ टक्क्यांनी वाढून ६६२.१ टन होती. तर वर्ष २०१३ मध्ये हीच मागणी ६१२.७ टन होती.
अहवालात केलेल्या उल्लेखाप्रमाणे मूल्य संदर्भात सोन्यातील गुंतवणुकीची मागणी ५३ टक्क्यांनी घट होऊन ४४,९४७.१ करोड रुपये होती. हीच मागणी २०१३ साली ९५,४६०.८ करोड रुपये होती.
डब्ल्यूजीसीचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पीआर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणुकीच्या मागणीवर सरकारी नीतीचा परिणाम दिसून आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.