www.24taas.com, पणजी
गोव्यात मौजमजा करायला किंवा फिरायला जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. गोवा सरकारने आजपासून राज्यात येणाऱ्या वाहनांवर प्रवेश कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर १०० रूपयांपासून सुरू होणार आहे.
दोडामार्ग, धारगळ, सातार्डा, केरी, मोले अशा सहा ठिकाणी गोवा सरकराने संगणकीकृत वसुली नाके उभारले आहेत. प्रत्येक नाक्यावर प्रवेश कराची वसुली करण्यासाठी प्रत्येकी ३ कर्मचारी २४ तास सेवा कार्यरत राहणार आहेत.
वाहन प्रवेश कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व कर्नाटकातील कारवार जिल्ह्याला तर बसणार आहेच. शिवाय पर्यटकांचाही खिसा हलका होणार आहे. ऑटो रिक्षा १०० रुपये, कार, जिप, पिकअप २५० रुपये, बस, ट्रक व सहाचाकी वाहने ५०० रुपये, क्रेन, रोडरोलर, अवजड वाहन १००० रुपये याप्रमाणे प्रवेश कर मोजावा लागणार आहे.