www.24taas.com, झी मीडिया, पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र अभिजित आणि डॉ. विनायक प्रभुदेसाई याची कन्या सई यांचा विवाहसोहळा गोव्यात साध्या पद्धतीने पार पडला. या सोहळ्याला सर्वच क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
या लग्न सोहळ्याला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, भाजपचे नेते लालकृष्ण आडवाणी, राजनाथ सिंग, अनंतकुमार, गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, उद्योगपती दत्तराज साळगावकर, झी ग्रुपचे प्रमुख सुभाष चंद्रा, उद्योगपती मुकेश अंबानी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवेन्द्र फडणवीस, किरीट सोमया यांच्यासह भाजपचे केंद्रातील आणि विविध राज्यातील नेते उपस्थित होते.
डॉ. विनायक आणि सौ. संध्या प्रभुदेसाई यांच्या सई या कन्येशी अभिजित यांचा विवाह गुरुवारी सायंकाळी पार पडला. त्यानंतर रात्री अकरा वाजेपर्यंत विवाहानिमित्त मेजवानीचा सोहळा झाला. विवाहावेळी मोदी, अडवाणी, ठाकरे, राजनाथ सिंग व अन्य अनेक भाजप नेते आणि उद्योगपती उपस्थित होते.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंग आदी नेतेही विवाह सोहळ्यास येऊन गेले. पर्रीकर मंत्रिमंडळातील बहुतेक मंत्री आणि विरोधी काँग्रेसच्या काही आमदारांसह सत्ताधारी भाजपच्या बहुतेक आमदारांनी विवाहानिमित्तच्या मेजवानी कार्यक्रमात सहभागी झालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ