नवी दिल्ली : सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झालाय. यंदाचा 97.32 टक्के निकाल लागलाय.
गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दीड टक्क्यानं घटलंय. गतवर्षी 98.87 टक्के निकाल लागला होता. यंदाही मुलींनीच यशाची परंपरा कायम ठेवलीये. मुलींमध्ये उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 97.82 टक्के आहे तर मुलांमध्ये हेच प्रमाण 96.98 टक्के आहे.
'सीबीएसई'च्या रिजन्समध्ये तिरुवनंतपुरमन विभागानं बाजी मारलीये. या विभागाचा निकाल तब्बल 99.77 टक्के लागलाय... तब्बल 13 लाख विद्यार्थी यंदाच्या या परीक्षेला बसले होते.
cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या दोन वेबसाइटवर हा निकाल बघता येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.