बाराबंकी : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थीनीचा लैंगिक छळ करून अश्लिल एमएमएस बनविल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याचे अधीक्षक मोहन वर्मा यांनी सांगितले की, २२ वर्षीय उबैद अफजल नावाच्या एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या एका मुलीला फसवून तिचे लैंगिक शोषण केले आणि त्याचा अश्लिल एमएमएस बनविला आणि आपल्या मित्रांना पाठविला.
वर्मांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळताच पीडित मुलीच्या वडिलांनी अप्पर पोलिस अधीक्षक ओ. पी. सिंह यांची भेट घेऊन सर्व हकिकत सांगितली. त्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करून बुधवारी उबैदला अटक करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.