एकतर्फी प्रेमातून मुलीनं FB वर फोटो टाकले, मुलाचं लग्न मोडलं

एकतर्फी प्रेमातून मुलांनी काही तरी उलट-सुलट कामं केलेली आपल्याला माहितीय, मात्र कोणत्या मुलीनं असं केलं तर... दिल्लीतील जानकीपुरम पोलीस स्टेशनमध्ये अशीच एक घटना समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून एका मुलीनं बीटेक फायनल इअरच्या मुलाचं लग्न मोडलं. 

Updated: Sep 18, 2014, 03:33 PM IST
एकतर्फी प्रेमातून मुलीनं FB वर फोटो टाकले, मुलाचं लग्न मोडलं  title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली: एकतर्फी प्रेमातून मुलांनी काही तरी उलट-सुलट कामं केलेली आपल्याला माहितीय, मात्र कोणत्या मुलीनं असं केलं तर... दिल्लीतील जानकीपुरम पोलीस स्टेशनमध्ये अशीच एक घटना समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून एका मुलीनं बीटेक फायनल इअरच्या मुलाचं लग्न मोडलं. 

आरती आणि रोहित (दोन्ही बदललेली नावं) बीकेटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे बीटेक फायनल इअरचे विद्यार्थी. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. आरती या मैत्रीला प्रेम समजली आणि मनातल्या मनात एकतर्फी प्रेम करू लागली. जेव्हा तिला कळलं की, रोहितचं लग्न ठरलंय तेव्हा तिनं त्याचं लग्न होऊ द्यायचं नाही, हे ठरवलं. 

रोहितचा साखरपुड्यानंतर आरतीनं त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. रोहितनं आपलं लग्न ठरल्याचं सांगून नकार दिला. आरतीला खूप धक्का बसला तिनं रोहितचं फेसबुकवर फेक अकाऊंट बनवून कॉलेज पार्टीतला एक फोटो त्यावर पोस्ट केला. आरतीनं या फोटोत स्वत:ला रोहितची गर्लफ्रेंड असं सांगितलं. शिवाय रोहितच्या होणाऱ्या बायकोलाही तिनं त्या अकाऊंटवर जोडलं. तिनं हा फोटो पाहून आपलं रोहितसोबतचं लग्न मोडलं. 

रोहितनं तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याच्या होणाऱ्या बायकोनं काहीही ऐकलं नाही. अखेर रोहितनं जानकीपुरम पोलीस स्टेशनमध्ये आरती विरोधात तक्रार दाखल केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.