रेल्वेचे कन्फर्म तिकीट असं मिळू शकते?

मुंबई : रेल्वेच्या आरक्षित तिकिटांसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना एक गूड न्यूज. एक नवे मोबाईल अ‍ॅप लाँच झाले आहे. ज्याने वेटिंग लीस्टवरच्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होणार आहे. या अॅपद्वारा पर्यायी गाडीची माहिती त्यांच्या मोबाईलर उपलब्ध होणार आहे.  

Updated: Jun 4, 2016, 05:47 PM IST
रेल्वेचे कन्फर्म तिकीट असं मिळू शकते? title=

मुंबई : रेल्वेच्या आरक्षित तिकिटांसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना एक गूड न्यूज. एक नवे मोबाईल अ‍ॅप लाँच झाले आहे. ज्याने वेटिंग लीस्टवरच्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होणार आहे. या अॅपद्वारा पर्यायी गाडीची माहिती त्यांच्या मोबाईलर उपलब्ध होणार आहे.

कसे मिळेल कन्फर्म तिकीट ?

‘कन्फर्म तिकीट अल्टरनेट्स’ असे या अ‍ॅपचे नाव असून ज्यावेळी कोणताही राखीव कोट्यातील प्रवाशांना तिकीट मिळत नाही त्यावेळी हे अॅप प्रवाशांच्या नक्कीच कामाला येईल. या अ‍ॅपमुळे आपल्याला आपल्या मुक्कामी पोहचण्यास कोणताही वेळ वाया न घालविता मदत मिळणार असल्याचा दावा सहसंस्थापक श्रीपाद वैद्य यांनी केला.