धक्कादायक : गांधीजींच्या मूर्तीची विटंबना; २६ जानेवारीला घातपाताची धमकी

मौसमाबाद येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मूर्तिवर काळं फासलं आहे. एवढंच नाही तर त्यावर आयसीस जिंदाबाद असं देखील लिहिलं आहे. सकाळी जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हापासून तणावाचं वातावरण आहे.

Updated: Jan 25, 2016, 04:13 PM IST
धक्कादायक : गांधीजींच्या मूर्तीची विटंबना; २६ जानेवारीला घातपाताची धमकी title=

जयपूर : मौसमाबाद येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मूर्तिवर काळं फासलं आहे. एवढंच नाही तर त्यावर आयसीस जिंदाबाद असं देखील लिहिलं आहे. सकाळी जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हापासून तणावाचं वातावरण आहे.

महात्मा गांधी यांची विटंबना करत त्यावर २६ जानेवारीला विध्वंसक रूप पाहायला मिळेल असं देखील त्यावर लिहिण्यात आलं आहे. मूर्तिच्या दुसऱ्या बाजुला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचं देखील नाव लिहिलं आहे.

या घटना लक्षात आल्यानंतर लोकांनी बाजारपेठा बंद ठेवल्या. जिल्हाधिकारी आणि पोलीस यांनी लगेचच त्या ठिकाणी धाव घेतली.  पोलीस या प्रकरणाची आणखी चौकशी करत आहे.