हा रिक्षावाला देतोय रिक्षामध्ये फ्री वायफाय सेवा

भारतात आता प्रत्येक व्यक्तीला इंटरनेट सेवेची आवश्यकता भासू लागली आहे. आग्रा येथील इफराक खान या रिक्षा चालकाने याच गोष्टीचं गांर्भिय लक्षात घेत स्वत:च्या रिक्षामध्ये वायफाय सुविधा सुरु केली आहे.

Updated: Sep 2, 2016, 11:51 AM IST
हा रिक्षावाला देतोय रिक्षामध्ये फ्री वायफाय सेवा title=

नवी दिल्ली : भारतात आता प्रत्येक व्यक्तीला इंटरनेट सेवेची आवश्यकता भासू लागली आहे. आग्रा येथील इफराक खान या रिक्षा चालकाने याच गोष्टीचं गांर्भिय लक्षात घेत स्वत:च्या रिक्षामध्ये वायफाय सुविधा सुरु केली आहे.
 
रिक्षाचालक म्हणतो की, आग्रा येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यांच्यासाठी त्यांनी ही वायफाय सेवा सुरु केली आहे. इफराक खान म्हणतो की, 'विदेशातून पर्यटक भारतात येतात तेव्हा त्यांना इंटरनेटची आवश्यकता असते. पर्यटक जेव्हा रिक्षामध्ये बसतात तेव्हा त्यांच्याकडे इंटरनेट सेवा नसते. यामुळेच त्यांने रिक्षामध्ये फ्री वायफाय सेवा देण्याचं ठरवलं.'