'आप' नेत्या शाजिया इल्मी भाजपात, निवडणूक लढविण्यास नकार

'आप'च्या स्टार प्रचारक शाजिया इल्मी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Jan 20, 2015, 02:13 PM IST
'आप' नेत्या शाजिया इल्मी भाजपात, निवडणूक लढविण्यास नकार title=

नवी दिल्ली : 'आप'च्या स्टार प्रचारक शाजिया इल्मी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सकाळी शाजिया इल्मी यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी भेट घेतली. यावेळी भाजपच्यावतीने अमित शाह यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने नारीशक्तीचा जागर सुरू केलाय.

अरविंद केजरीवाल यांना धोबीपछाड देण्यासाठी भाजपने महिलास्त्र उपसलंय.आपच्या माजी नेत्या शाझिया इल्मी यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी भाजपच्या वतीने त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. गुरुवारी धडाकेबाज माजी पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण बेदी यांना गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.