जबरदस्तीने गर्भधारणा नंतर बाळांची विक्री

 घरकाम देण्याच्या बहाण्याने झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील तरुणींना दिल्लीला नेऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. दिल्लीहून परतलेली पतुरा गावातील सुमतीने बाल कल्याण समितीचे सदस्य संजय कुमार  आणि मीडिया समोर जे काही सांगितले की त्यांने अक्षरशः त्यांच्या अंगावर काटा आला. 

Updated: Jan 30, 2015, 07:21 PM IST
जबरदस्तीने गर्भधारणा नंतर बाळांची विक्री title=

गुमला :  घरकाम देण्याच्या बहाण्याने झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील तरुणींना दिल्लीला नेऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. दिल्लीहून परतलेली पतुरा गावातील सुमतीने बाल कल्याण समितीचे सदस्य संजय कुमार  आणि मीडिया समोर जे काही सांगितले की त्यांने अक्षरशः त्यांच्या अंगावर काटा आला. 

तिने दिलेल्या माहितीनुसार झारखंडमधून दिल्लीला नेलेल्या तरूणींना लग्नाशिवाय मुलांना जन्म देण्यास भाग पाडले जात होते. त्यानंतर त्यांनी जन्म दिलेल्या बाळांना मोठी रक्कम घेऊन विकले जात होते.  दिल्लीतील झारखंड मॅन पॉवर ब्युरो नावाची प्लेसमेंट एजन्सी या कामाशी संलग्न आहे. 

ही एजन्सी नैना कुमारी उर्फ मालती नामक महिला चालवते. ती या भागातील तरुणींना चांगला पगार देण्याचे आमिष दाखवून दिल्लीला घेऊन जात होती. त्या ठिकाणी त्यांना धमकावून त्यांचे शारिरीक शोषण केले जात होते. त्यानंतर त्यांना बाळांना जन्म देण्यास भाग पाडले जात होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.