नवी दिल्ली : तुम्ही एखाद्या व्हीआयपी व्यक्तींच्या मागे उभे असलेल्या बॉडीगार्ड अथवा सिक्युरिटी गार्डला पाहिलेय का? त्यांच्या डोळ्यावर नेहमी काळा चष्मा असतो. हा काळा चष्मा घालण्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? तर घ्या जाणून
खरतर हा काळा चष्मा घालण्यामागचे कारण स्टाईल नव्हे तर आपण कोठे बघतोय हे कोणाला कळू नये म्हणून ते हा चष्मा घालतात. त्यांची नजर कोठे आहे हे त्या चष्म्यामुळे समजत नाही.
बॉडीगार्ड असल्या कारणाने त्यांना नेहमी सतर्क राहावे लागते. दरम्यान काही अनुचित घटना घडल्या उदाहरणार्थ अचाकन स्फोट अथवा गोळीबार झाल्यास साहाजिक आपले डोळे बंद होतात. मात्र सुरक्षारक्षकांना नेहमीत डोळ्यात तेल घालून पहारा करावा लागतो. यावेळी त्यांना हा काळा चष्मा मदत करतो.
सिक्युरिटी गार्डसकडे शत्रूंच्या हालचाली लक्षात घेण्याचे आणि शत्रूंना त्यांच्या हालचाली समजून घेण्याचे एकमेव साधन असते ते म्हणजे डोळे. यांना अशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाते की ते डोळ्यांवरुनही समोरच्या व्यक्तींच्या डोक्यात काय शिजत असेल त्यांचे प्लान काय असू शकतात याचा अंदाज लावू शकतात. शत्रूंनी असे करु नये यासाठी हा चष्मा लावलेला असतो.
त्यासोबतच सतत बाहेर असल्याकारणाने डोळ्यांची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. बाहेरील धूळ, ऊनाचा त्रास यामुळेही हा काळा चष्मा घातला होता.